धावत्या एक्सप्रेसमध्ये महिलेनं शिजवली मॅगी, रेल्वेकडून कठोर कारवाई

 धावत्या एक्सप्रेसमध्ये महिलेनं शिजवली मॅगी, रेल्वेकडून कठोर कारवाई

मुंबई, दि. २२ : एका महिला प्रवाशाने धावत्या ट्रेनमध्ये मॅगी बनवल्याचा ट्रेनमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. महिलेच्या ट्रेनच्या या व्हायरल व्हिडीओला 65 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गंभीर प्रकारामुळे रेल्वे प्रशासन खडबडून जागं झालं आहे. एक महिला इंडियन रेल्वेच्या एसी कोचमध्ये मोबाईल चार्जिंग पॉईंटला किटली लावून मॅगी बनवते.महिलेचा हा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला असून प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. महिलेनं केलेल्या धक्कादायक प्रकारामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे.

व्हिडीओ व्हायरल होताच सेंट्रल रेल्वेच्या अधिकृत एक्स हँडलवर कठोर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की,ट्रेनमध्ये इलेक्ट्रॉनिक किटलीचा वापर करण्यास बंदी आहे. हे फक्त असुरक्षित आणि बेकायदेशीर नाही, तर दंडनीय गुन्हा आहे.रेल्वेने महिलेला इशारा देत म्हटलं की,अशा प्रकारच्या कृतींमुळे आगीच्या घटना घडू शकतात आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

मध्ये रेल्वेने ट्वीटरवर म्हटलंय की,व्हिडीओत दिसणाऱ्या महिलेवर आणि पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. महिलेनं केलेल्या कृत्यामुळे वीजपुरवठ्यात अडथळा निर्माण होऊ शकतो आणि ट्रेनच्या एसी तसेच इतर तांत्रिक गोष्टींचं नुकसान होऊ शकतं.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *