सुलोचना दीदी यांच्या निधनाने हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीचे मातृरुप हरपले

मुंबई दि.5( एम एमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील मातृरुप हरपले आहे, अशी शोकभावना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांनी आपल्या दमदार अभिनयाने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. त्यांनी आईची भुमीका ही तनमनाने व आत्मतीयतेने साकारली. त्यांनी चित्रपटातील आईची असलेली भुमिका एकरुप होऊन साकारली आहे. तसेच त्यांनी पडद्यावरील आईची भुमिका ही अजरामर केली. हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांच्या आईची भुमिका एकरुप होऊन साकारल्यामुळे सिने सृष्टीतील आई ही भुमिका त्यांनी अजरामर केली. आणि हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीच्या त्या मातृरुप ठरल्या . त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. अशी शोकभावना ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
सुलोचना दीदी यांच्या निधनामुळे पुन्हा भारतीय चित्रपटसृष्टीला त्यांच्यासारखी आई ही लाभणार नाही. आईची भुमिका अजरामर करणा-या सुलोचना दीदींना देशभरातील रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
SW/KA/SL
5 June 2023