आमचा जीव गेल्यावर शासन निर्णय काढणार का ?

 आमचा जीव गेल्यावर शासन निर्णय काढणार का ?


मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आश्वासन नको, शासन निर्णय पाहिजे. अशी मागणी घेऊन राज्यातील आरोग्य विभागाचा कणा असणाऱ्या ७२ हजार आशा सेविका आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. भर उन्हात मैदानात सावली नसल्याने या सेविकांना उष्माघाताचा त्रास होऊ लागला आहे. सरकार आमचा जीव गेल्यावर शासन निर्णय काढणार आहे का ? असा सवाल या आशा सेविका महिला सरकारला करत आहेत.

सरकारी कर्मचारी जे काम करतात त्यापेक्षा आम्ही जास्त काम करतो. मात्र त्यांना वेतन आयोगाप्रमाणे लाखो रुपये वेतन,भत्ते इतर सोयी सुविधा मिळतात.आणि आम्हाला तुटपुंजा मोबदला दिला जातो असे का ? असा सवाल सुनीता पवार या आशा सेविकेने सरकारला यावेळी केला.

भर दुपारी आझाद मैदानात सावली नसल्याने आमच्या बहिणींना उष्माघाताचा त्रास होऊ लागला आहे.जेवणाची व्यवस्था नाही.धूळ उडत असताना आम्ही गावावरून आणलेल्या भाकरी खात आहोत.पिण्याच्या पाण्यासाठी जो पाण्याचा टँकर आहे त्यामध्ये अशुद्ध पाणी आहे. उन्हात ठेवलेला टँकर तापल्यामुळे पाणीही गरम झाले आहे.ते पिऊ शकत नाही.विकतचे पाणी आम्हाला परवडत नाही.असा त्रास सरकार जाणीवपूर्वक तर करत नाही ना ? असे सवाल सीमा माने या आशा सेवीकेने केला.

सरकार फक्त घोषणा करत सुटले आहे. अनेक वर्षापासून आम्ही घोषणा ऐकून कंटाळलो आहे. त्यामुळे आता या घोषणा व आश्वासन ऐकने सहन होत नाही.या भर उन्हात आमचा जीव गेला तरी चालेल.आता माघार घेणार नाही हि आमची आर पार ची लढाई आहे.असे सांगत तीव्र शब्दात सरकारचा निषेध या सेविका करत होत्या.Will the government take a decision when our lives are lost?

ML/KA/PGB
13 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *