पहिलीपासून कृषी अभ्यास सुरू करणार
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पहिलीपासून कृषी अभ्यास सुरू करण्यासाठी कृषी विभाग आणि शालेय शिक्षण विभागामध्ये करार झाला असल्याची माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दापोली येथे दिली.दापोली येथील मंत्री डॉ.केसरकर यांनी रविवारी (२४) बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधला.
राज्य सरकार सध्या शैक्षणिक धोरणात बदल करण्याच्या उपाययोजना राबवत आहे. पर्यावरणाच्या असंतुलनाचा परिणाम होत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून शिक्षण विभाग मुलांमध्ये जागृती करण्यासाठी सकारात्मक उपाययोजना करत असल्याचेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.
पहिलीपासून कृषी अभ्यासक्रम सुरू केला तर जनजागृती होईल. चालू शैक्षणिक वर्षात याची सुरुवात करण्यात येणार आहे. या बाबत मंत्री केसरकर म्हणाले की, मुलांमध्ये शेतीची आवड निर्माण होण्यासाठी पहिलीपासून अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.
पर्यावरणाचे संतुलन बिघडले असल्याचे आपण फक्त बोलत राहतो. त्यात बदल करण्यासाठी आपल्याला निसर्गाशी नाते जोडायला पाहिजे. त्यासाठी कृषीशिवाय पर्याय नाही.
त्यामुळेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शेतीकडे वळा, असा संदेशही दिला जाणार आहे. कृषी विभाग आणि शालेय शिक्षण विभाग यांच्यामध्ये करार झाला आहे. त्याची अंमलबजावणी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार आहे. Will start agricultural studies from the beginning
ML/KA/PGB
26 Dec 2023