दिल्लीपुरता मर्यादित असलेला आप आता राष्ट्रीय पक्ष, मुंबई महापालिका संपुर्ण ताकदीने लढवणार

 दिल्लीपुरता मर्यादित असलेला आप आता राष्ट्रीय पक्ष, मुंबई महापालिका संपुर्ण ताकदीने लढवणार

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आप पक्षाने एक मोठी भरारी घेतली आहे. राष्ट्रीय पक्ष होण्यासाठीचे निकष पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे सुरुवातीला दिल्लीपुरता मर्यादित असलेला आप हा प्रादेशिक पक्ष, आता राष्ट्रीय पक्ष झाला असून गुजरातच्या लोकांचे मी आभार मानते. ज्यांच्या मतांमुळे आप राष्ट्रीय पक्ष बनला आहे. आम आदमी प्रत्येक राज्यात आपवर विश्वास ठेवत आहे याची प्रचिती निवडणुकांच्या निकालावरून सिद्ध होतं आहे. असा विश्वास प्रीती शर्मा- मेनन यांनी प्रेस क्लब मध्ये बोलताना व्यक्त केला.will now fight the Mumbai Municipal Corporation with full force

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे गृहराज्य आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या राज्यात आम आदमी पक्षाने १४% पेक्षा जास्त मतांचा वाटा मिळवून आपली छाप पाडली आहे. गुजरातच्या लोकांचे प्रेम आणि समर्थन यासाठी आम्ही सदैव ऋणी राहू. आम आदमी पार्टीचे यश खरोखरच ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे. भारतातील इतर कोणताही राजकीय पक्ष आपल्या मूळ प्रदेशातून बाहे पडला नाही आणि इतर राज्यांमध्ये निवडणुका जिंकला नाही. पण आम आदमी पार्टीने हे करून दाखवलं असे मत प्रीती शर्मा यांनी व्यक्त केले.

आपने आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे.आपने आतापर्यंत दीड लाखाच्यावर सदस्य नोंदणी केली आहे. पालिका निवडणुकीसाठी आपकडून 200 युनिट पर्यंत मोफत वीज,मोफत जलजोडणी,खड्डे विरहित रस्ते,मुंबईची स्वच्छता, मलनिस्सारण वाहिन्या,मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून उपाययोजना यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.आमचा एसआरए योजनेला विरोध आहे.सध्या आमच्याकडे सात लाख मतदार असून ती संख्या 12 लाखावर गेल्यास आमची सत्ता पालिकेत येऊ शकते,असा विश्वास प्रीती मेनन यांनी व्यक्त केला.

ML/KA/PGB
8 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *