जंगली हत्तींनी केले शेतीचे मोठे नुकसान
भंडारा, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ओरिसाच्या जंगलातून भटकंती करत महाराष्ट्राच्या सीमेत आलेला 23 हत्तींचा कळप भंडारा जिल्ह्यात पोहोचला आहे. सध्या या हत्तींचा कळप लाखनी तालुक्यातील रेंगेपार या गाव शिवारातील शेती भागातून नुकसान करीत आहे.Wild elephants cause huge damage to agriculture
पश्चिम दिशेला लागून असलेल्या वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक 380 मध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. कळपात 1 वयस्क मादा, 1 मोठा नर हत्ती, 6 बछडे आणि बाकीचे युवा नर व मादा हत्ती आहेत.
सहा महिने पहिले गडचिरोली जिल्ह्यात राहिलेला हा हत्तीचा कळप स्वातंत्र्यानंतरच्या काळात पहिल्यांदाच आत्ता भंडारा जिल्ह्यात आल्यामुळे वन प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, मात्र या हत्तींमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. But the farmers are worried because these elephants are causing huge losses to the farmers.
हत्तीमुळे झालेल्या पिकांचे नुकसानीचे वन विभागाच्या चमूद्वारे क्षेत्राची पाहणी करून नुकसान भरपाईचे पंचनामे नोंदविले आहेत. शासन निर्णयानुसार या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तत्परतेने देण्यात येणार आहे. हत्तींचा कळप मानवी वस्तीकडे जाणार नाही याकरीता वनविभाग आवश्यक उपाययोजना करीत असून वनविभागाची चार पथके घटनास्थळी दाखल होऊन कार्यवाहीसाठी सज्ज झाली आहेत.
वनविभागाद्वारे स्थानिक नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात येत आहे व नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे. आज हत्तींचा कळप राष्ट्रीय महामार्ग 53 ओलांडून जाण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांची देखील मदत घेण्यात येणार आहे. नागरिकांनी हत्तींना बघण्याकरिता जंगलात प्रवेश करू नये व कळपाच्या जवळ जाऊ नये कारण असे केल्यास हत्ती आक्रमक होतात व प्राण घातक हल्ला करू शकतात याकरिता नागरिकांनी दक्षता घेऊन वनविभागास सहकार्य करावे असे आवाहन वनविभागाद्वारे करण्यात येत आहे.
ML/KA/PGB
1 Dec .2022