मुलीच्या वाढदिवसासाठी परदेशातून आला आणि जीव गमावून बसला, बायकोला अटक

आपल्या ६ वर्षांच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लंडनहून मेरठमध्ये आलेल्या नवऱ्याची बायकोने हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सौरभची पत्नी मुस्कान (२७) आणि तिचा बॉयफ्रेंड साहिल (२५) यांनी गुन्हा कबूल केला असून त्यायालयाने त्यांना १४ दिवसांची कोठडी सुनावली आहेमर्चंट नेव्ही अधिकारी असलेला सौरभ राजपूत २४ फेब्रुवारीला भारतात आला. त्यानंतर त्याची पत्नी मुस्कान व तिच्या बॉयफ्रेंडने साहिल यांनी त्याची 4 मार्च रोजी हत्या केली. संशय येऊ नये म्हणून हत्येनंतर त्याच्या शरीराचे 15 तुकडे करण्यात आले आणि ते सिमेंटने भरलेल्या ड्रममध्ये टाकून सील केले. हत्येच्या जवळपास 15 दिवसांनंतर मंगळवारी (दि. 18 मार्च) त्यांच्या भाड्याच्या घरातून मृतदेहाचे अवशेष मिळाले. सौरभच्या ६ वर्षांच्या मुलीने आपले वडील ड्रममध्ये असल्याचे परिसरातील काहींना सांगितले होते. त्यानंतर या हत्येचा सुगावा लागला. दरम्यान, सौरभच्या आईने खुलासा केला की, तिच्या सहा वर्षांच्या नातीने हा गुन्हा पाहिला.