सीमाभाग संदर्भातील ठराव विधिमंडळात का नाही ?
नागपूर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सीमाभाग प्रकरणी ठराव घ्यायचं ठरलेलं असताना अजून तो का आला नाही असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केला , प्रश्नोत्तराच्या तासापूर्वी हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.
अजित पवारांनी हा मुद्दा नियम ५७ अन्वये उपस्थित करत सर्व कामकाज बाजूला ठेऊन चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली होती, त्याला पृथ्वीराज चव्हाण यांनी अनुमोदन दिले मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या सदस्यांना बोलू देत नाही असा आरोप करीत ते आक्रमक
झाले आणि ते जागा सोडून पुढे गेले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बोलू देण्याची विनंती केली, त्याला अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी स्वीकारून परवानगी त्यांना दिली, सरकारने सगळं काम बाजूला ठेऊन यावर चर्चा केली पाहिजे , संपूर्ण राज्य सीमा वासियांच्या मागे ठाम उभे आहे ही भावना पोहोचली पाहिजे अशी भावना भास्कर जाधव यांनी यावेळी व्यक्त केली. सीमा भागाची एक एक इंच जागा आपण लढवू , सीमा वसियांच्या मागे ठाम उभे आहोत , बिलकुल मागे हटणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं
आज शहीद दिनाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत गेले आहेत ते लवकर आले तर आजच किंवा उद्या हा ठराव घेऊ असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. या दरम्यान नियमाप्रमाणे कामकाज चालतं तेव्हा हेत्वारोप करणं योग्य नाही अशी समज अध्यक्षांनी भास्कर जाधव यांना दिली.
यानंतर जयंत पाटील यांचे निलंबन मागे घ्यावं अशी विनंती अजित पवारांनी केली ,सरकारनं समजुतीने भूमिका घ्यावी , मुख्यमंत्री दिल्ली हून परत आल्यावर त्यावर निर्णय घेऊ असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यावर विरोधकांनी सभात्याग केला.
दरम्यान विधान परिषदेतही उपस्थित झाला , उध्दव ठाकरे यांनी सीमाभाग केंद्र शासित करा अशी मागणी केली. त्यावर तुमची सत्ता असताना तुम्ही काय केले , आताच हा मुद्दा एवढा का जोरात आणला असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला. यावर मुख्यमंत्री दिल्लीत गेले आहेत ते परत आल्यावर ते यावर बोलतील अशी माहिती विधानकार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.त्यानंतर सभागृह पंधरा मिनिटे तहकूब करण्यात आले.
ML/KA/SL
26 Dec. 2022