राज्यात कोण मोठे नेते जिंकले कोण हरले

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून महाविकास आघाडीचा चांगलीच पिछेहाट झाली आहे. आघाडीतील तीन मुख्य पक्षांना एकत्रितपणेही अर्धशतक गाठता आलेले नाही. या निवडणूक निकालाने आयुष्य राजकारणात घालवलेल्या प्रमुख नेत्यांना घरी बसवले आहे. प्रमुख विजयी नेते आणि प्रमुख पराभूत नेते यांच्या बाबत आपण सविस्तर जाणून घेऊया.
प्रमुख विजयी नेते
- विधानसभा निवडणुकीत ठाण्यातल्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १ लाख २० हजार ७१७ मतांनी विजयी झाले.
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून ६४ हजार ८७३ मतांनी विजयी झाले.
- राज्यात सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघातून अजित पवार १ लाख ८९९ मताधिक्यानं विजयी झाले.
- साकोलीतून नाना पटोले टपाली मतदानात केवळ पाचशे २९ मतांनी विजयी झाले आहेत.
- वडेट्टीवार ब्रम्हपुरी मतदारसंघातुन अटीतटीची लढाई लढत विजयी झाले आहेत.
- दुसरीकडे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कामठी मतदारसंघातून,तर बल्लारपूर इथुन सुधीर मुनगंटीवार आघाडीवर आहेत, चंद्रपूर इथून किशोर जोरगेवार आणि चिमुर मतदारसंघातून भाजपाचे बंटी भागडीया यांनी विजयी आघाडी घेतली आहे.
- गोंदिया जिल्हयात चारही जागा महायुतीनं जिंकल्या आहेत. अहेरी इथुन माजी मंत्री राष्ट्रवादीचे बाबाराव आत्राम विजयी झाले आहेत.
- छत्रपती संभाजीनगरमधल्या औरंगाबाद पूर्व मतदारसंघात अतुल सावे यांनी एआयएमआयएम पक्षाच्या इम्तियाज जलील यांच्यावर निसटता विजय मिळवला.
- राज्य मंत्रिमडळातील छगन भुजबळ, अदिती तटकरे, उदय सामंत, दीपक केसरकर, दिलीप वळसे-पाटील , तानाजी सावंत , हसन मुश्रीफ आपापल्या मतदारसंघात विजयी झाले.
- इस्लामपूरमध्ये अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे जयंत पाटील विजयी झाले.
- तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा क्षेत्रात रोहित पाटील विजयी झाले.
- अहेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा अत्राम त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार भाग्यश्री अत्राम यांच्याविरोधात विजयी
- बडनेरा मतदारसंघात रविराणा विजयी झाले.
आजच्या निकालात, विरोधी पक्षाच्या अनेक दिग्गजांना पराभव पत्करावा लागला
- कराड मतदारसंघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपच्या, अतुल भोसले यांनी पराभव केला.
- संगमनेर मतदारसंघात काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांचा शिवसेनेच्या अमोल खताळ यांनी १० हजार ५६० मतांनी पराभव केला.
- घनसावंगी मतदारसंघात माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.
- प्रहार जनशक्ती पक्षाच्या बच्चू कडू यांनाही अचलपूर मतदारसंघात पराभव पत्करावा लागला.
- कर्जत-जामखेड मतदारसंघात राम शिंदे यांनी रोहित पवार यांचा पराभव केला.
कोल्हापूर जिल्हयात महायुतीचे १० पैकी १० ही उमेदवार विजयी झाले आहेत. करवीर इथून शिवसेनेचे चंद्रदीप नरके,
कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर, कोल्हापूर दक्षिण मधून भाजपाचे अमल महाडीक, इचलकरंजीतून राहुल आव्हाडे, हातकणंगलेतून अशोक माने, पन्हाळातून विनय कोरे, कागलमधून हसन मुश्रीफ तर चंदगडमध्ये भाजप बंडखोर शिवाजी पाटील विजयी झाले आहेत.
शिरोळ विधानसभा मतदार संघात शिवसेना पुरस्कृत उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा विजय झाला आहे.
सातारा जिल्हयात विधानसभेच्या आठही जागांवर महायुतीनं विजय मिळवल्यामुळे एकेकाळचा काँग्रेस आणि शरद पवारांचा गड ढासळला आहे. भाजपानं ४, शिवसेनेनं २ तर राष्ट्रवादी काँग्रेसनंही २ जागा जिंकत जिल्हयात महायुतीचं वर्चस्व प्रस्थापित केलं.
कराड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करत भाजपाचे अतुल भोसले विजयी झाले आहेत
साताऱ्यात भाजपाच्या शिवेंद्र राजे-भोसले यांनी सुमारे पावणेदोन लाख मत घेत शिवसेना उबाठा पक्षाच्या अमित कदम याचा पराभव केला. या मतदार संघामध्ये कराड उत्तर आणि कराड दक्षिणमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे.
वाई मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील, कोरेगावमध्ये शिवसेनेचे महेश शिंदे तर फलटणमध्ये सचिन पाटील विजयी झाले आहेत. पाटणमध्ये शंभुराज देसाई यांनी विजय मिळवला आहे. तर कराड उत्तर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बाळासाहेब पाटील यांच्यावर मात करत भाजपाच्या मनोज घोरपडे यांनी विजयश्री खेचून आणली.
माण मतदार संघात भाजपाचे जयकुमार गोरे पुन्हा विजयी झाले आहेत.
SL/ML/SL
23 Nov. 2024