कांजूर ची जागा नेमकी कोणाची , केंद्राची आता भूमिका काय
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील कांजूरमार्ग इथे आता मेट्रो रेल्वे साठी कार शेड उभारायला जी जागा दिली ती नेमकी कोणाची आहे, उर्वरित जागेचे काय करणार आहात आणि त्या जागेवर दावा सांगणाऱ्या केंद्राची आता भूमिका काय असे सवाल युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.Who exactly replaces Kanjur, what is the role of the center now
राज्य सरकारने कांजूर येथे पंधरा हेक्टर जागेवर मेट्रो सहाची कार शेड उभारायला ती जमीन एमएमआरडीए कडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिल्यानंतर आज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे मुद्दे उपस्थित केले आहेत.
आम्ही चार ,पाच मेट्रो प्रकल्प एकत्रित करून कांजूर ला कार शेड उभारायला सुरूवात केल्यावर तिथे एका बिल्डरने दावा सांगितला आणि केंद्र सरकारने ती जागा आपली असल्याचे सांगत प्रकरण कोर्टात नेल्याने मुंबईकरांचे मोठे नुकसान झाले असा आरोप ठाकरे यांनी केला आहे.
त्यावेळी ते काम सुरू झाले असते तर मुंबईकरांचा वेळ आणि पैसा वाचला असता , सरकारचे दहा हजार कोटीही वाचले असते मात्र या घटना बाह्य सरकारला कंत्राटदारांचे हित जपायचे आहे, बिल्डरांच्या घशात उर्वरित जमीन घालायची आहे त्यामुळे हे प्रकार केल्याचा आरोप ही आदित्य ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत केला.
ML/KA/PGB
15 Apr. 20 23