पांढऱ्या वाघाचे बछडे पर्यटकांसाठी झाले उपलब्ध

छ. संभाजी नगर दि ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महानगरपालिकेच्या सिध्दार्थ उद्यान येथे सहा महिन्यापूर्वी जन्मलेले ०२ पांढऱ्या वाघांच्या बछड्यांना आज मुक्त संचार करण्याकरिता बाहेर मोकळ्या पिंजऱ्यात सोडण्यात आले. कान्हा आणि विक्रम हे ते दोन बछडे मुक्त संचार करित सहा महिन्यानंतर पर्यटकांच्या भेटीला आले आहे.
छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या सिध्दार्थ उद्यान येथे सहा महिन्यापूर्वी जन्मलेले ०२ पांढऱ्या वाघांच्या बछड्यांना आज मुक्त संचार करण्याकरिता बाहेर मोकळ्या पिंजऱ्यात सोडण्यात आले. वाघांचे शहर म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या सिध्दार्थ उद्यान प्राणी संग्रहालय येथील पांढऱ्या वाघांचे दोन बछडे कान्हा आणि विक्रम यांना आयुक्त तथा प्रशासक जी.श्रीकांत यांच्या हस्ते पिंजऱ्याचे दार उघडून त्यांना मोकळ्या वातावरणात बाहेरील मोठ्या मोकळ्या पिंजऱ्यात मुक्त संचार करीता सोडण्यात आले.
अर्पिता आणि वीर या पांढऱ्या वाघांच्या जोडीच्या दोन बछड्यांचा जन्म झाला होता.कान्हा आणि विक्रम असे नामकरण करून त्यांना नवीन ओळख देण्यात आली. आज सहा महिन्यानंतर पर्यटकांच्या भेटीला हे दोन पांढरे वाघांचे बछडे मोकळ्या पिंजऱ्यात सोडण्यात आले आहेत त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांची सर्व कृती सामान्य असल्याचे वाघांचे काळजी वाहक मोहम्मद जीया यांनी सांगितले.