केंद्र सरकारने काढली श्वेतपत्रिका तर काँग्रेसने जारी केली कृष्णपत्रिका

नवी दिल्ली, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आज लोकसभेत देशाची आर्थिक स्थिती मांडणारी श्वेतपत्रिका सादर केली आहे. या श्वेतपत्रिकेत UPA सरकार आणि NDA सरकारच्या काळातील देशातील तुलनात्मक आर्थिक परिस्थिती मांडण्यात आली आहे. UPA सरकारच्या काळातील धोरण लकव्यामुळे दशकांपासून निर्माण झालेली आर्थिक आव्हाने आपण परिणामकारकपणे पेलत सातत्यपूर्ण विकास केल्याचा दावा नरेंद्र मोदी सरकारने केला आहे. तर भाजप सरकारच्या या दाव्याला खोडून काढत काँग्रेसने कृष्णपत्रिका प्रसिद्ध केली आहे.
केंद्र सरकारने White Paper on the Indian Economy या नावाने सादर केलेल्या या ५९ पानी श्वेतपत्रिकत मुख्यत: २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकार येण्या पूर्वीच्या काळातील भारतीय अर्थव्यवस्थेची नाजूक स्थिती मांडण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की देशाची अर्थव्यवस्था आता पाचव्या स्थानावरून जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये गेली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात गरीब सार्वजनिक वित्त, आर्थिक गैरव्यवस्थापन, आर्थिक अनुशासनहीनता आणि व्यापक भ्रष्टाचार यासारख्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले. या पत्रिकेत अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि शासन प्रणाली सुधारण्यासाठी सरकारला येणाऱ्या जबाबदारीचे मोठेपणा अधोरेखित केले आहे.
तर याला उत्तर म्हणून काँग्रेसने जारी केलेल्या ५७ पानी श्र्वेतपत्रिकेत पंतप्रधान मोदींनी वारंवार उल्लेख केलेल्या गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या चार जातींवर झालेल्या अन्यायाचा लेखाजोखा काँग्रेसने मांडला आहे. त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपचा १० वर्षांचा काळ हा अन्यायाचा काळ असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसने श्वेत पत्रिकेत गेल्या 10 वर्षात तरुण, महिला, शेतकरी, अल्पसंख्याक आणि मजुरांवर झालेल्या अन्यायाचा उल्लेख केला आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे एनडीए सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, किती लोकांना रोजगार मिळाला याचा उल्लेख सरकार करणार नाही. सरकार राज्यांबाबत भेदभावपूर्ण वृत्तीने वागत आहे.
SL/KA/SL
8 Feb. 2024