सांगली डीसीसी बँकेच्या विरोधात निघाला चाबूक मोर्चा
सांगली, दि. २५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कोट्यावधीच्या रुपयाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली चाबूक मोर्चा काढण्यात आला. सांगलीतील स्टेशन चौक पासून जिल्हा मध्यवर्ती बँकेपर्यंत या मोर्चात शेकडो शेतकरी आंदोलन सहभागी झाले होते. मोठ्या कर्जदार पुढार्यांना त्यांची कर्ज माफ करायची आणि गरीब शेतकऱ्यांना कर्जासाठी त्रास द्यायचा असा संचालक मंडळाचा उद्योग आहे. साखर कारखाने मुद्दामून बंद पाडायचे आणि राजकीय पुढाऱ्यांच्या ताब्यात दिले आहेत. कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करणाऱ्या या संचालक मंडळाला बरखास्त करून प्रशासक नेमावा अशी मागणी खोत आणि पडळकर यांनी केली आहे.
दरम्यान सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आणि आमदार मानसिंगराव नाईक यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. मागच्या संचालक मंडळाची चौकशी सुरू आहे मात्र, सध्या बँक चांगल्या प्रकारे कार्यरत असताना चुकीचे आरोप केले जात आहेत असे आ नाईक यांनी सांगितले. एसटीचे आंदोलन करून एसटी बँकेच्या संचालक मंडळात जाण्याचा उद्योग केला. तसाच मागच्या दरवाज्यातून सांगली बँकेत येण्याचा खोत आणि पडळकर यांचा डाव असल्याचाही आरोप आमदार मानसिंगराव नाईक यांनी केला आहे.
ML/ML/SL
25 June 2024