आपलं अन्न कुठून येतं? हा प्रश्न विचारत राहा

 आपलं अन्न कुठून येतं? हा प्रश्न विचारत राहा

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आपण खातो त्या पदार्थांची निर्मिती कुठे आणि कशी झाली आहे याविषयी माहिती करून घ्या.

कधीकधी खाद्यपदार्थ निर्मितीच्या प्रक्रियेत पर्यावरणासाठी हानीकारक घटकांचा वापर होतो. तसंच दूरवरून एखादा पदार्थ आणण्यासाठी वाहनांचा वापर केलेला असतो. असे पदार्थ प्लॅस्टिकच्या वेष्टनात गुंडाळलेले असू शकतात. हे टाळता येईल का याचा विचार करा.

अन्नाच्या ‘कार्बन फूटप्रिंट’चाही विचार करा. कार्बन फूटप्रिंट म्हणजे एखाद्या प्रक्रियेतून जागतिक तापमानवाढीस कारणीभूत असलेल्या वायूंचं उत्सर्जन किती झालं, याची गोळाबेरीज.

मांसाहारी पदार्थांची कार्बन फूटप्रिंट तुलनेनं अधिक असल्यानं अनेक पर्यावरणप्रेमी मांसाहार टाळण्याचा किंवा कमी करण्याचा सल्ला देतात. कुणी तर अगदी व्हेगन बनतात, म्हणजे प्राण्यांपासून मिळणारे कुठलेच पदार्थ खात नाहीत.

पण प्रत्येक पदार्थाची अशी आकडेवारी काढणं शक्य होईलच असं नाही आणि प्रत्येकाचं पोट कसं भरायचं असा प्रश्न उभा राहतो. शिवाय शाकाहारी पदार्थांचीही ‘कार्बन फूटप्रिंट’ जास्त असू शकते.

शक्य असेल तर भाजीपाल्यासारख्या गोष्टींची घरी लागवड करा किंवा जवळच्या भागातून आलेल्या मालाला प्राधान्य द्या. त्यामुळे तुम्हाला ताजं मिळेल. तसंच साठवणूकीवर खर्च होणारी उर्जा आणि ते सडल्यानं निर्माण होणारा कचरा हे दोन्ही प्रश्न उभे राहणार नाहीत.

तुमच्या परिसरातील उत्पादकांना आधार मिळेल, हा बोनस. Where does our food come from? Keep asking this question

ML/KA/PGB
26 Sep 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *