उपनगरीय रेल्वेसेवा ट्रॅकवर कधी येणार

मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा भाग असलेली उपनगरीय रेल्वे सेवा गेल्या काही वर्षांपासून वारंवार कोलमडून जात आहे.अपुऱ्या गाड्या, महिला प्रवाशांसाठी मोजके डबे, प्लॅटफॉर्मसवरील शौचालयांची दुरावस्था, रात्रीच्या वेळी प्रवास करताना वाटणारी असुरक्षितता या साऱ्यामुळे उपनगरीय भागातील प्रवासी दररोज अगदी जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांच्यासाठी पुरेशा विशेष गाड्या आणि राखीव डबे उपलब्ध नाहीत. यातून अनेकदा प्रवाशांना दारात लटकून प्रवास करावा लागतो. ऐन गर्दीच्यावेळी तर ट्रेनमधील प्रवाशांना श्वास घेणेही मुश्कील होऊन बसते. या आणि अशा अनेक समस्यांवर उत्तर शोधून प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी उपनगरीय एकता प्रवासी महासंघाच्या द्वारे रेल्वे प्रशासन आणि केंद्र शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला जातो. याविषयी आजच्या वर्तमानच्या भागात आपण संवाद साधला आहे. उपनगरीय रेल्वे एकता प्रवासी महासंघाच्या अध्यक्ष – लता अरगाडे यांच्याशी. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. रेल्वे प्रवासाबाबतचे तुमचे अनुभव आम्हाला कमेट करून अवश्य शेअर करा. हा एपिसोड अधिकाधीक लोकांना शेअर करा जेणेकरून रेल्वे प्रशासनाला या समस्यांवर लवकरात लवकर उपाययोजना करण्यासाठी उद्युक्त होईल.

incognito@trimitiy.com

http://mmcnewsnetwork.com

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *