व्हॉट्सॲप लवकरच आणणार सीक्रेट कोड फीचर

 व्हॉट्सॲप लवकरच आणणार सीक्रेट कोड फीचर

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपले खासगी संभाषण सुरक्षित रहावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. अमेरिकन कंपनी मेटा यांच्या मालकीचे मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप लवकरच ‘सिक्रेट कोड’ फीचर आणत आहे. या फीचरद्वारे यूजर्स गुप्त कोड टाकून त्यांच्या खासगी चॅट लॉक करू शकतील.व्हॉट्सॲपने आपल्या X हँडलवर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. सिक्रेट कोड फीचर वापरण्याची प्रक्रियाही या पोस्टमध्ये शेअर करण्यात आली आहे.

WhatsApp ने गेल्या वर्षी वैयक्तिक चॅट लॉक करण्याचे फीचर लाँच केले होते. या फीचरद्वारे चॅट लॉक करता येते. पण, त्यासाठी स्मार्टफोनचा पासवर्ड, फिंगरप्रिंट आणि फेस लॉकचा वापर केला जातो.तर ‘सिक्रेट कोड’ फीचर चॅट लॉक करण्यासाठी फोनच्या पासवर्डसोबतच नवीन सिक्रेट कोड सेट करण्याचा पर्याय देते. अक्षरे, संख्या, विशेष वर्ण आणि इमोजी वापरून गुप्त कोड तयार केला जाऊ शकतो.

असा करा वापर

व्हॉट्सअ‍ॅपवर तुमच्या चॅट्स खासगी ठेवण्यासाठी, तुम्ही लॉक केलेल्या चॅट्सची लिस्ट उघडा. तिथे तुम्हाला सगळ्यात वरती तीन डॉट दिसतील, तिथे तुम्ही क्लिक करा. यानंतर, चॅट लॉक सेटिंग्जवर जा आणि हाईड लॉक चॅट ऑन करा आणि सिक्रेट कोड सेट करा, जो तुमच्या लक्षात राहील. यानंतर तुम्हाला लॉक केलेल्या चॅट मुख्य चॅटमध्ये दिसणार नाही, जिथे सर्व युजर्सच्या चॅट दिसतात. व्हॉट्सअ‍ॅपच्या चॅट स्क्रीनवर खाली स्वाईप करताना तुम्हाला लॉक केलेल्या चॅट्सचा शॉर्टकट दाखवते किंवा तुम्हाला तुमच्या लॉक केलेल्या चॅट्स पाहायच्या असल्यास व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्च बारमध्ये तुमचा सिक्रेट कोडसुद्धा टाकू शकता.

SL/KA/SL

3 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *