व्हॉट्सॲपने कायमचे बंद केले ७० लाख भारतीय नंबर

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीयांच्या दैनंदिन संपर्क यंत्रणेत मोठी भूमिका बजावणाऱ्या व्हॉट्सॲपने ने आता भारतातील ७० लाखांहून अधिक नंबर आता कायमचे बंद केले आहेत. व्हॉट्सॲपवरून फेक कॉल किंवा स्पॅम मेसेज येण्याचा त्रास अनेकांना सहन करावा लागतो. यातून अनेकांची सायबर फसवणूकही होत असते. व्हॉट्सॲपकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या युजरवर दर महिन्याला कारवाई करण्यात येत असते. याविरोधात कठोर भूमिका घेत एप्रिल महिन्यात व्हॉट्सॲपने तब्बल ७१ लाख भारतीय वापरकर्त्यांवर कारवाई केली आहे. मेटाच्या व्हॉट्सॲपने १ एप्रिल २०२४ ते २० एप्रिल २०२४ दरम्यान केलेल्या कारवाईची माहिती दिली. व्हॉट्सॲपचा गैरवापर किंवा चुकीचा वापर करणाऱ्यांवर कायमचे निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच यापुढील काळातही अशीच कारवाई सुरू ठेवू, असेही व्हॉट्सॲपने सांगितले आहे.
एप्रिल महिन्यात व्हॉट्सॲपने ७१,८२,००० वापरकर्त्यांवर कायमचे निर्बंध घातले आहेत. यापैकी १३,०२,००० अकाऊंट्सला कुणीही रिपोर्ट केले नसतानाही त्यांना काढून टाकण्यात आले आहे. कोणताही गैरप्रकार होण्याआधी त्याच्यावर आळा घालण्यासाठी व्हॉट्सॲपकडून पावले उचलण्यात येत असतात. मशीन लर्निंग आणि डेटा ॲनालिटिक्सच्या सहाय्याने कंपनी संशयास्पद वर्तनाचा शोध घेत असते. एप्रिल महिन्यात व्हॉट्सॲपला १०,५५४ युजर रिपोर्ट प्राप्त झाले होते. या आधारावर केवळ सहा खात्यांवर कारवाई करण्यात आली.
भारतातील माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ नुसार ही कारवाई करण्यात आल्याचे व्हॉट्सॲप जाहीर केले आहे. वापरकर्त्यांच्या तक्रारी आणि कायद्याच्या उल्लंघनावर नियंत्रण आणण्यासाठी या नियमावलीत तरतुदी करण्यात आल्या आहेत. एप्रिल प्रमाणेच जून महिन्यातही चुकीचे वर्तन, वापरकर्त्यांच्या तक्रारी आणि मशीन लर्निंगच्या सहाय्याने व्हॉट्सॲप कठोर पावले
ML/ML/SL
3 June 2024