या देशात व्हॉट्सॲपवर बंदी, वापरावे लागेल स्वदेशी ॲप

 या देशात व्हॉट्सॲपवर बंदी, वापरावे लागेल स्वदेशी ॲप

मुंबई, दि. १४ : रशियाने संपूर्ण देशात मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपवर बंदी घातली आहे. रशियन सरकारने सांगितले की, व्हॉट्सअॅपने रशियन कायदे आणि नियमांचे पालन केले नाही, त्यामुळे ते बंद करण्यात आले आहे. रशियाने सामान्य लोकांना स्थानिक ॲप ‘मॅक्स’ वर स्विच करण्यास सांगितले.

रशियामध्ये विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनवर आधीपासूनच ‘मॅक्स’ इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. काही देशांमध्ये व्हॉट्सअॅप पूर्णपणे बॅन नाही, परंतु त्याच्या व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंग फीचरवर बंदी आहे.

संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि कतारमध्ये असे नियम लागू आहेत जिथे टेक्स्ट मेसेजिंगला परवानगी आहे परंतु व्हिडिओ कॉलिंगवर बंदी आहे.
इजिप्त आणि जॉर्डनमध्येही व्हॉट्सअॅपच्या कॉलिंग फंक्शन्स किंवा काही सेवांवर नियंत्रण आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *