केंद्र सरकारने उठवली कुस्ती महासंघावरील बंदी

नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क): क्रीडा मंत्रालयाने आज भारतीय कुस्ती महासंघ (WFI) वरील बंदी उठवली आहे.त्यामुळे देशांतर्गत स्पर्धा आयोजित करण्याचा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी राष्ट्रीय संघांची निवड करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि तदर्थ समिती प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळत होते.
२१ डिसेंबर २०२३ रोजी WFI चे अध्यक्ष झाल्यानंतर, संजय सिंह यांनी माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या क्षेत्रात राष्ट्रीय ज्युनियर चॅम्पियनशिप आयोजित करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर २४ डिसेंबर रोजी क्रीडा मंत्रालयाने WFI वर बंदी घातली.जानेवारी २०२३ मध्ये, महिला कुस्तीगीरांनी ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले १६ जानेवारी २०२३ रोजी, ऑलिंपिक पदक विजेत्या साक्षी महिला, विनेश फोगाट आणि अनेक महिला कुस्तीगीरांनी जंतरमंतरवर धरणे सुरू केले आणि तत्कालीन WFI अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला.
ऑलिंपिक पदक विजेता बजरंग पुनिया देखील त्यांच्या समर्थनार्थ निषेधात सामील झाला. त्यावेळी, क्रीडा मंत्रालयाच्या आश्वासनानंतर, कुस्तीगीरांनी संप मागे घेतला होता आणि एप्रिलमध्ये पुन्हा आंदोलन केले होते. SL/ ML/ SL
11 March 2025