आज संध्याकाळी सुरळीत होईल पश्चिम रेल्वेची वाहतूक

पालघर, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पालघर रेल्वे स्थानकात घसरलेले मालगाडीचे डबे रुळावरून काढण्याचं काम सुरू असून पश्चिम रेल्वेची विस्कळित झालेली उपनगरीय रेल्वे सेवा संध्याकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे.
या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी चार जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. अशी माहिती पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक ( डीआरएम ) नीरज वर्मा यांनी दिली आहे. रेल्वेरुळ दुरुस्त करण्याचं कामही युद्ध पातळीवर सुरू आहे. काही एक्स्प्रेस गाड्या या हळू हळू सोडण्यात येत असून विरार पर्यंत सर्व स्थानकावर त्यांना थांबे देण्यात येत आहेत.
दरम्यान काल या अपघातामुळे रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. अप आणि डाऊन गाड्या फक्त डाऊन मार्गावरून च सुरू असल्याने डहाणू ते विरार दरम्यानच्या प्रवासाला चार पाच तास लागत आहेत. मुंबईत राहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना आज प्रवेश परीक्षेसाठी पालघर केंद्र देण्यात आल्याने त्यांचे पुरते हाल झाले आहेत.
ML/SL/ML
29 May 2024