पंढरपूरात उभारला जाणार 129 कोटींचा अत्याधुनिक सुसज्ज दर्शन मंडप
पंढरपूर, दि. ८ : पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांसाठी मोठी सुविधा उभारली जात आहे. तब्बल १२९ कोटी रुपये खर्चून गोपाळपूर रोडवरील दोन एकर जागेत अत्याधुनिक दर्शन मंडप तयार होत असून, यात वातानुकूलित रांगा, स्वच्छतागृहे, अन्नछत्र, विश्रामकक्ष, आपत्कालीन मार्ग, प्रथमोपचार केंद्र व अतिदक्षता विभागाची सोय असेल. वयोवृद्ध व दिव्यांग भाविकांसाठी विशेष रेलिंग, लिफ्ट तसेच मंदिरापर्यंत थेट पोहोचण्यासाठी स्काय वॉक उभारला जाणार आहे. मंडपात भाविकांना विठ्ठलाचे लाईव्ह दर्शन स्क्रीनवरून घेता येईल. आषाढी व कार्तिकी वारीत ७-८ किमीपर्यंत लांबणाऱ्या रांगेत भाविकांना आता त्रास सहन करावा लागणार नाही. कंत्राटदाराने यंदाच्या आषाढी वारीपूर्वी ८०% काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असून, २०२६ पर्यंत हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे.
SL/ML/SL