मराठी अभिनेत्रीने लिहिलेल्या कादंबरीवर आधारित वेबसरिज लवकरच OTT वर
मुंबई, दि. 4 : मराठमोळी युट्यूबर प्राजक्ता कोळीने लिहिलेल्या Too Good to be True या कादंबरीवर आता नेटफ्लिक्स वेब सिरीज तयार करणार आहे, व्हरायटी इंडियाच्या अहवालानुसार, या वेब सिरीजमध्ये प्राजक्ता कोळी स्वतः मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे ती फक्त अभिनयच नाही तर या प्रोजेक्टची निर्मितीही करणार आहे. या सिरीजचे चित्रीकरण 2026 च्या शेवटी सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या प्रोजेक्टविषयीची उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढली आहे.
प्राजक्ता कोळी मराठीतील पहिल्या युट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरपैकी एक असून अभिनयातही तिने चांगली कामगिरी केली आहे. प्राजक्ताने ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या चित्रपटातून मराठी सिनेमात पदार्पण केले. नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय रोमँटिक सिरीज Mismatched मधील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर Jug Jugg Jeeyo, Sunny Sanskari Ki Tulsi Kumari आणि Single Papa यांसारख्या चित्रपटांमध्येही ती झळकली आहे.
SL/ML/SL