नवीन सरकार आल्यावर आम्ही पूर्ण अर्थसंकल्प सादर करू

 नवीन सरकार आल्यावर आम्ही पूर्ण अर्थसंकल्प सादर करू

नवी दिल्ली,दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्या (१ फेब्रु) अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण होणार आहे. उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प मांडतील. हे पर्व नारीशक्तीच्या साक्षात्काराचं पर्व आहे. नवं सरकार पूण अर्थसंकल्प सादर करेल असा विश्वासही मोदींनी यावेळी व्यक्त केला आहे.

“संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं मार्गदर्शन लाभणार आहेत. तसंच गुरुवारी निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प पटलावर ठेवण्यात येईल. नारीशक्तीच्या साक्षात्काराचं हे पर्व आहे. मी आशा करतो की मागच्या दहा वर्षात ज्यांना ज्या मार्गाने जायचं होतं त्या मार्गाने संसदेत प्रत्येकाने कार्य केलं. आज मी हे सांगू इच्छितो की ज्यांना दंगा घालण्याची सवयच झाली आहे, जे धुडगूस घालून लोकशाही मूल्यांचं वस्त्रहरण करतात अशा खासदारांनी शेवटच्या सत्रात आत्मपरिक्षण करावं.” असंही मोदी यांनी महटलं आहे.

विरोधाचा स्वर तिखट असला, आमच्यावर कितीही टीका झाली तरीही विरोधकांनी जर चांगले आणि योग्य मुद्दे मांडले तर, आपल्या बोलण्यातून ज्यांनी चांगले विचार ठेवले त्यांना लोक स्मरणात ठेवतात. आमच्या विरोधात तिखट प्रतिक्रिया दिली असेल तरीही देशातला एक मोठा वर्ग लोकशाहीच्या या मार्गाने केलेल्या टीकेचंही स्वागत करतो. मात्र ज्यांनी लोकशाहीची मूल्यं बाजूला सारणं, तसंच गोंधळ घालणं ज्यांचा स्वभाव आहे त्यांनी माफी मागण्याची वेळ आली आहे. तसंच गोंधळ घालणाऱ्या खासदारांनी जरा आत्मपरीक्षण करावं असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

SL/KA/SL

31 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *