सरकारच्या मदतीने जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू

 सरकारच्या मदतीने जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू

अहिल्यानगर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय आणि राज्य नेतृत्वाने माझ्यावर महाराष्ट्राच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून माझा मोठा सन्मान केला अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत प्रदेश भाजपचे नूतन कार्याध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण यांनी राष्ट्रीय तसेच प्रदेश नेतृत्वाला चव्हाण यांनी धन्यवाद दिले आहेत.

नियुक्तीनंतर प्रथमच ते माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भाजप हा कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष आहे हे या नियुक्तीतून पुन्हा सिध्द झाले आहे. कार्यकर्ता म्हणून काम करताना कोणतीही अपेक्षा न करता एका विचार धारेबरोबर काम करीत असतात. जबाबदारीच ओझं खांदयावर येतं तेव्हा दडपणही येते. कार्यकारी अध्यक्ष ही तशी फार मोठी जबाबदारी आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखालील पूर्ण बहुमताचे महायुतीचे चांगले सरकार महाराष्ट्रात आहे. राज्यातील जनतेच्या अपेक्षा देवेन्द्रजी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

चव्हाण पुढे म्हणाले की, सरकार बरोबर संघटना आणि संघटनेचा कार्यकर्ता असणे खुप गरजेचे असते. पंडित दीनदयाळजी यांनी संदेश दिला होता की, शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारचं काम पोहोचविणे हेच खऱ्या अर्थाने संघटना आणि कार्यकर्त्यांचे काम असते. देवेन्द्रजीनी सर्व विभागांना १०० दिवसांचा कार्यक्रम दिला आहे. त्याद्वारे ते अतीशय गतिमान पद्धतीने सरकारच्या योजना कार्यान्वित करतील. परंतु ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम संघटना आणि कार्यकर्त्यांचे असणार आहे. त्यामुळे ते एक मोठे आव्हान असणार आहे.
राज्य संघटनेतील कार्यकर्त्यांच्या मदतीने ते काम नक्कीच पुढे नेण्याचा प्रयत्न करु अशी ग्वाही त्यांनी दिली.

साईबाबांच्या तीर्थक्षेत्री शिर्डीत आज माझ्या नावाची घोषणा झाली. नक्कीच साईबाबांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे.
गेल्या निवडणुकीत देवेंद्रजी आणि बावनकुळेंच्या नेतृत्वात आम्ही सर्वांनी एकसंघपणे काम केले. राष्ट्रीय नेतृत्वाचे संपुर्ण लक्ष या निवडणुकीवर होते. त्यांच्या नेतृत्वामुळे हे सर्व यश मिळविणे शक्य झाले आहे. यश आणि यशाचे अनेक जण मानकरी असतात. आम्हीं सर्वांनी मिळविलेले फार मोठे असे हे कार्यकर्त्यांचे सामुहिक यश आहे. संघटनेचे निर्णय खालपर्यंत घेऊन जाणे ही आपल्यावर जबाबदारी असून निवडणुकांची जबाबदारी देवेंद्रजी पक्षाचे पार्लमेंटरी बोर्ड घेते.

येणाऱ्या काळात जनतेच्या सेवेबरोबरच त्यांच्या अपेक्षा पुर्ण करणे हे खूप गरजेचे आहे. निवडणुका येतील आणि जातील यश, अपयश यांचा विचार न करता जनतेला सरकारचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची ग्वाहीही चव्हाण यांनी यावेळी दिली. दीड कोटी सदस्यांचे उद्दिष्ठ गाठण्याचे संघटनेचे नियोजन आहे. येणाऱ्या काळात पक्षश्रेष्ठी आणि त्यांच्या मर्जीने आवश्यक गोष्टी करण्याचा प्रयत्न करु असा विश्वासही चव्हाण यांनी शेवटी व्यक्त केला.

ML/ML/SL

12 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *