आम्ही पाकिस्तानला धडा शिकवला, संरक्षण दलाने केले स्पष्ट

 आम्ही पाकिस्तानला धडा शिकवला, संरक्षण दलाने केले स्पष्ट

नवी दिल्ली, दि. ११ : ऑपरेशन सिंदूर च्या सशस्वीतेबद्दल सांगण्यासाठी भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय वायूदलाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे, तसंच पाकिस्तानच्या लष्कराच्या 35-40 जवानांचा या ऑपरेशनमध्ये मृत्यू झाल्याची माहिती भारताच्या लष्कराने दिली. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर कशाप्रकारे एअर स्ट्राईक केला, हे भारतीय सेनेच्या अधिकाऱ्यांनी पुराव्यासकट दाखवलं आहे. डीजीएमओ लेफ्टिनंट जनरल राजीव घई, डीजी एअर ऑपरेशन्स एके भारती, डीजी नेव्ही ऑपरेशन्स वाइस एडमिरल एएन प्रमोद यांनी पाकिस्तानवर कशाप्रकारे हल्ला केला गेला? याची पूर्ण माहिती दिली.

लष्कराने सांगितले की, आम्ही 6 आणि 7 मे च्या रात्री कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य केले नाही. पण 7 मे रोजी पाकिस्तानने आमच्या लष्करी तळांना आणि नागरी क्षेत्रांना लक्ष्य केले. मग आम्ही त्यांच्या हवाई संरक्षण प्रणाली आणि रडारला लक्ष्य केले. बहावलपूरमध्ये 3 क्षेपणास्त्रे डागून आम्ही दहशतवाद्यांचे लपण्याचे ठिकाण उद्ध्वस्त केले. 7 मे रोजी ड्रोन डागण्यात आले. आम्ही दहशतवाद्यांना मारले पण पाकिस्तानने आमच्या सामान्य लोकांना लक्ष्य केले. आम्ही लाहोरचे रडार आणि गुजरानवाला येथील AEW प्रणाली नष्ट केली.

लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले, ‘आम्ही अनेक दहशतवाद्यांचे अड्डे ओळखले होते. पण भीतीमुळे अनेक दहशतवाद्यांचे अड्डे रिकामे करण्यात आले. लक्ष्ये खूप विचारपूर्वक ठरवली गेली. बहावलपूर आणि मुरीदकेचे लक्ष्य हवाई दलाला देण्यात आले होते. अचूक लक्ष्यीकरण सुनिश्चित करण्यासाठी हवेपासून पृष्ठभागावर अचूक दारूगोळा वापरण्यात आला. 7 मे च्या हल्ल्यानंतर आमची हवाई संरक्षण यंत्रणा तयार

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *