आम्हाला अर्धवट आरक्षण नको , विशेष अधिवेशन बोलवा…
जालना, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपण अर्धवट आरक्षण घेणार नाही आणि ते तुम्ही देऊ पण नका. आम्ही आमच्या बांधवांची बैठक बोलावली, आम्ही त्या बैठकीत त्या विषयी चर्चा करणार आहेत अशी आपली भूमिका आज अंतरवाली सराटी इथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केली आहे.
व्यवसायावर जाती निर्माण झाल्या आहेत, तुम्ही किती जरी बहाणे सांगितले तरी ते आम्ही ऐकणार नाही, एका पुराव्यावर पण आरक्षण देता येतं, तुमच्या कडे हजारो पुरावे आहेत.
आरक्षण देण्यासाठी तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. ज्यांना आरक्षण पाहिजे ते घेतील, ज्यांना नाही घ्यायचं त्यांनी घेऊन नये असे सांगत मराठ्यांनी शेती विषयाची लाज वाटून घेऊ नये असे ही त्यांनी स्पष्ट केले.
तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर ते तुम्ही सर्वांना सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्या असे त्यांनी सरकारला सुनावले. शेतीवर आधारित, व्यवसायावर जाती निर्माण झाल्या आहेत, माळी समाजाचा व्यवसाय शेती आहे त्यांना आरक्षण आहे.
सरकारला 15 हजार नोंदी मिळाल्या आहेत. सरकारने विशेष अधिवेशन तातडीने बोलवले पाहिजे. या संदर्भातील समितीला राज्याचा दर्जा द्या आणि आरक्षण देऊन टाका अशी मागणी जरांगे यांनी केली.
काल पासून मराठा समाजाने काल मला आग्रह केला आणि मी काल पासून पाणी घेण्यास सुरुवात केलीय. मी लढणारा मराठा आहे तुम्ही आत्महत्या करू नका, आक्रमक होऊ नका,
आपलं सगळी कडे उपोषण सुरू आहे, साखळी उपोषण, आमरण उपोषण सुरू ठेवा, आणि गावांमध्ये राजकीय नेत्यांना येऊ देऊ नका असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले.
कालपेक्षा वातावरण आता ठीक आहे, वातावरण थंड झालंय. मराठवाड्यातले आणि पश्चिम महाराष्ट्रातील सगळे भाऊ आहेत , आपण कोणाला राजीनामा दे असं म्हटलं नाही, सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी एक गट स्थापन करावा आणि सरकारकडे आरक्षणाची मागणी करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मराठा बांधवांनी थोडा संयम बाळगावा, आपल्याला आपल्या जातीला न्याय मिळवून द्यायचा आहे. मी काल 4 वाजेपासून पाणी पितो आहे आणि आता बसता पण येत आहे असे सांगत आंदोलकांनी थोडा संयम बाळगावा असे आवाहन मनोज जरांगे यांनी या पत्रकार परिषदेत केले.
ML/KA/SL
31 Oct. 2023