मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली! तानसा आणि मोडकसागर ओव्हर-फ्लो

 मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली! तानसा आणि मोडकसागर ओव्हर-फ्लो

ठाणे, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील तानसा धरण 24 जुलै रोजी संध्याकाळी 4.15 मिनिटांनी तर मोडकसागर धरण काल रात्री ओव्हरफ्लो होऊन वाहू लागल्याने मुंबई करांचे पाण्याचे टेन्शन दूर झाले आहे.

मोडकसागर धरण काल रात्री 10.52 वाजता दुथडी भरून वाहू लागल्याने त्याचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले असून, 6 हजार क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
यापूर्वीच तानसा धरण भरून वाहू लागल्याने धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.भातसा धरणही 65 टक्के भरले आहे .

मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाण्याची पातळीत चांगलीच वाढ झाली असून सर्व धरणात पाण्याचा साठा वाढल्याने तूर्तास मुंबईकरांचे पाण्याचे टेन्शन मिटले आहे. शहापूर तालुक्यातील तानसा धरणाखालील आणि लगत असलेल्या भावसे, मोहिली, वावेघर, अघई, टहारपूर, नवेरे, वेलवहाळ, डिंबा तसेच खैरे या गाव, वाड्या, पाड्यातील रहिवाश्यांनी सतर्क रहाण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी यांनी दिले आहेत.

शेतकऱ्यांची पाऊसाअभावी रखडलेली शेतीच्या कामांना देखील तालुक्यात वेग आला असून, तालुक्यातील सर्व शेतजमिनी पाण्याने भरलेल्या असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. तसेच जून महिन्यात पाऊस न पडल्याने येथील धरणातील पाणीसाठा कमी होतहोता त्यामुळे मुंबई मनपाने ठराविक ठिकाणी पाणी कपात सुरू केली होती. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात शहापूर तालुक्यात धरण क्षेत्रात पाऊसाने जोरदार हजेरी लावली असल्याने तालुक्यातील भातसा, मोडकसागर व मध्य वैतरणा धरणातील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे.

दरम्यान कल्याण मुरबाड रस्त्यावरील रायते इथल्या पुलावरून उल्हास नदीचे पाणी वाहू लागल्याने कल्याण मुरबाड नगर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

ML/ML/PGB
24 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *