पवना धरणातील पाणीसाठा ५४.१३ टक्के
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा पवना धरण मुख्य स्रोत आहे. पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणीसाठा १७ टक्क्यांवर आला होता. मावळातील आंद्रा, वडिवळे, टाटा या छोट्या धरणांमधील पाणीसाठ्याने तळ गाठायला सुरुवात केली होती.
मागील चार दिवसांपासून पावसाने धरण पाणलोट क्षेत्रात दमदार हजेरी लावली. जोरदार पावसाने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. १ जूनपासून धरण परिसरात १०७७ मिली मीटर पावसाची नोंद झाली. तर, पाणीसाठ्यात ३६.७ टक्क्यांनी वाढ झाली. धरणातील पाणीसाठा ५४.१३ टक्क्यांवर पोहोचला आहे. पुढील सहा महिन्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला असून, आता शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा आहे
Water storage in Pavana Dam is 54.13 percent
ML/ML/PGB
24 July 2024