पार्ले, अंधेरी, जोगेश्वरी पूर्व विभागात बुधवारी, गुरुवारी पाणीबानी

 पार्ले, अंधेरी, जोगेश्वरी पूर्व विभागात बुधवारी, गुरुवारी पाणीबानी

मुंबई दि.25(एम एमसी न्यूज नेटवर्क) : पालिकेतर्फे अंधेरी (पूर्व) येथील ‘बी. डी. सावंत मार्ग व कार्डिनल ग्रेसिअस मार्ग जंक्शन ते कार्डिनल ग्रेसिअस मार्ग व सहार मार्ग जंक्शन येथे प्रत्येकी १५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी आणि नवीन १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी (पार्ले आऊटलेट) या दोन मुख्य जलवाहिन्या जोडण्याचे व जुनी नादुरुस्त १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी काढून टाकण्याचे काम बुधवार, २९ मे रोजी सकाळी ९ वाजेपासून गुरुवार ३० मे रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत (१६ तास) हाती घेण्यात येणार आहे.

हे काम पूर्ण झाल्यानंतर वेरावली जलाशय १, २, ३ ची पाण्याची पातळी सुधारेल व त्यामुळे अंधेरी (पूर्व) व (पश्चिम), जोगेश्वरी (पूर्व) व (पश्चिम), विलेपार्ले (पूर्व) व (पश्चिम) या भागांच्या पाणीपुरवठ्यामध्ये कायमस्वरुपी सुधारणा होणार आहे. या दुरुस्ती कालावधीत म्हणजे बुधवार, सकाळी ९ वाजेपासून गुरुवार, ३० मे रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत (१६ तास) के पूर्व, के पश्चिम व पी दक्षिण विभागातील खालील नमूद केलेल्या परिसरांतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

१) त्रिपाठी नगर, मुन्शी वसाहत, बस्तीवाला कंपाऊंड, कलेक्टर वसाहत मातोश्री क्लब, दुर्गा नगर सकाळी ८. ते सकाळी ९. वाजेदरम्यान पाणीपुरवठा होईल.

२) के पूर्व विभाग- दुर्गा नगर, सारीपुत नगर – पाणीपुरवठा बंद राहील.

३) के पूर्व विभाग- दत्त टेकडी, ओबेराय स्प्लेंडर, केलती पाडा, गणेश मंदीर परिसर जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्ता (JVLR) – पाणीपुरवठा बंद राहील.

४) के पूर्व विभाग- बांद्रेकरवाडी, फ्रान्सिसवाडी, मखरानीपाडा, सुभाष मार्ग, चाचानगर – पाणीपुरवठा बंद राहील.

५) के पूर्व विभाग- वांद्रे भूखंड, हरी नगर, शिवाजी नगर, पास्कल वसाहत, शंकरवाडी पाणीपुरवठा बंद राहील.

६) के पूर्व विभाग- विशाल सभागृह, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकरवाडी, बिमा नगर, पंथकी बाग, तेली गल्ली, हाजी जुमान चाळ, कोळ डोंगरी, जीवा महाले मार्ग, साई वाडी, जीवन विकास केंद्र, शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान नगर, श्रद्धानंद मार्ग, नेहरू मार्ग, तेजपाल मार्ग, शास्त्री नगर, आंबेडकर नगर, काजूवाडी, विलेपार्लेचा बहुतांश भाग – पाणीपुरवठा बंद राहील.

७) के पूर्व विभाग- पंप हाउस, विजय राऊत मार्ग, पाटीलवाडी, हंजर नगर, झगडापाडा, पारसी वसाहत, जिजामाता मार्ग, गुंदवली हिल, आशीर्वाद चाळ – पाणीपुरवठा बंद राहील.

८) के पूर्व विभाग- जुना नागरदास मार्ग, मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग, पारसी पंचायत मार्ग, आर. के. सिंग मार्ग, निकोलसवाडी परिसर – पाणीपुरवठा बंद राहील.

९) पी दक्षिण विभाग– बिंबीसार नगर, बांद्रेकरवाडी, वनराई, राज्य राखीव पोलीस दल (SRPF) परिसर – पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.

१०) पी दक्षिण विभाग– राम मंदीर मार्ग, गोरेगाव (पश्चिम) पाणीपुरवठा बंद राहील.

११) के पश्चिम विभाग– सी. डी. बर्फीवाला मार्ग, उपाश्रय गल्ली, स्वामी विवेकानंद मार्ग अंधेरी, दाऊद बाग, केव्हणी पाडा, धाकुशेठ पाडा, मालकम बाग, अंधेरी बाजारपेठ, भर्डावाडी, आंब्रे गार्डन पंप पाणीपुरवठा बंद राहील.

१२) के पश्चिम विभाग– जुहू-कोळीवाडा, जुहू तारा मार्ग ( जुहू-कोळीवाडा झोन के पश्चिम – ११) – पाणीपुरवठा बंद राहील.

१३) के पश्चिम विभाग– देवराज चाळ, स्वामी विवेकानंद मार्ग (जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्ता ते जोगेश्वरी बस आगार) स्वामी विवेकानंद मार्ग जोगेश्वरी भाग – २ – के पश्चिम ०१) – पाणीपुरवठा बंद राहील.

१४) के पश्चिम विभाग– चार बंगला, डी. एन. नगर, जुहू-वेसावे जोडरस्ता चार बंगला झोन – के पश्चिम – ०७) – पाणीपुरवठा कमी प्रमाणात हेाईल.

१५) के पश्चिम विभाग– विलेपार्ले (पश्चिम), लल्लूभाई उदयान, लोहिया नगर, विलेपार्ले गावठाण, मिलन सबवे, संपूर्ण जुहू परिसर, व्ही. एम. मार्ग, नेहरू नगर विलेपार्ले झोन – के पश्चिम ०९) – पाणीपुरवठा बंद राहील.

१६) के पश्चिम विभाग– मोरागाव, जुहू गावठाण मोरागाव झोन – के पश्चिम ०८) – पाणीपुरवठा बंद राहील.

१७) के पश्चिम विभाग– यादव नगर, सहकार मार्ग, बांदिवली हिल, मोमीन नगर, खजूरवाडी, जोगेश्वरी फाटक, जोगेश्वरी स्थानक मार्ग, कॅप्टन सामंत मार्ग यादव नगर – के पश्चिम ०४) – पाणीपुरवठा बंद राहील.

१८) के पश्चिम विभाग– गिल्बर्ट हिल, सागर सिटी, गावदेवी डोंगरी, जुहू गल्ली, वायरलेस मार्ग, श्रीनाथ नगर गिल्बर्ट हिल झोन – के पश्चिम ०६) – पाणीपुरवठा बंद राहील.

SW/ML/SL

25 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *