मुंबईत लवकरच सुरू होणार जल मेट्रो सेवा

 मुंबईत लवकरच सुरू होणार जल मेट्रो सेवा

छायाचित्र प्रातिनिधीक

मुंबई, दि. १४ : मुंबई महानगरात “जल मेट्रो प्रकल्प” सुरू करण्यासाठी मे. कोची मेट्रो लि. ने तयार केलेल्या फिजीबिलीटी अहवालानुसार सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी मे. कोची रेल लि. यांची सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही संस्था प्रस्तावित जलवाहतुकीच्या दृष्टीने, वाहतूक अभ्यास, पायुभूत सुविधा, नौकानयनविषयक बाबी, कनेक्टिव्हिटी, जलयान, जलवाहतुकीचे कार्यचालन व व्यवस्थापन, खर्चाची अंदाजपत्रके, वित्तीय पृथ:क्करण, अंमलबजावणीचा आराखडा यांचा अभ्यास करून अहवाल देणार असल्याचे लेखी पत्राद्वारे महाराष्ट्र सागरी मंडळाचे नौकानयन सल्लागार व मुख्य बंदर अधिकारी कॅ. प्रवीण खरा यांनी खासदार रवींद्र वायकर यांना कळवले आहे.

मुंबईच्या दैनंदिन वाहतूककोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार रवींद्र वायकर यांनी लोकसभेत नियम ३७७ अन्वये केलेल्या मागणी नुसार या प्रश्नी खासदार वायकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पत्र पाठवले होते. मुंबईच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामानाने मुंबईतील अंतर्गत रस्ते पायाभूत सुविधा यात म्हणावा तसा बदल झालेला नाही. वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईच्या वाहतुकीवर याचा परिणाम होत असून मुंबईकरांना दरदिवशी तासनतास वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात इंधन वाया जात आहे. एमएमआरची लोकसंख्या २०२३ मध्ये २.५८ कोटींवरून २०३० पर्यंत अंदाजे ३ कोटीच्या वरती जाण्याची शक्यता आहे.

कोची येथील अभ्यास दौरानिमित्त “जल मेट्रो प्रकल्प” प्रणालीचा अनुभव व अभ्यास करण्याची संधी मिळाली तसेच बैठकाही घेण्यात आल्या. सागरमाला योजना २.० अंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रात जल मेट्रो प्रकल्प सुरू करण्याची योजना तयार करण्यात यावी.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *