मुंबईजवळ सापडली १५०० वर्षे जुनी जल व्यवस्थापन रचना

 मुंबईजवळ सापडली १५०० वर्षे जुनी जल व्यवस्थापन रचना

मुंबई, दि. ३१ :

मुंबई जवळील जागगतिक वारसा स्थळ असलेल्या एलिफंटा बेटावर (घारापुरी) इतिहासाचा एक अनमोल ठेवा सापडला आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) केलेल्या उत्खननात सुमारे 1500 वर्षांपूर्वीची दगडी बांधकामातील जलसंधारण रचना सापडली आहे. टी-आकाराचा हा पायऱ्यांचा जलसाठा (स्टेप्ड रिझर्व्हॉयर) पाहून पुरातत्व शास्त्रज्ञही थक्क झाले असून, यामुळे प्राचीन काळातील प्रगत जलव्यवस्थापन तंत्रावर नवा प्रकाश पडणार आहे.

ASI ने दिलेल्या माहितीनुसार, हा जलसाठा साधारण 14.7 मीटर लांब असून त्याची रुंदी 6.7 मीटर ते 10.8 मीटर दरम्यान आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या 5 मीटर खोलीपर्यंतच्या उत्खननात सुमारे 20 दगडी पायऱ्या सुस्थितीत सापडल्या आहेत.

या संरचनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे बांधकाम करण्यासाठी वापरलेले दगड स्थानिक बेटावरचे नसून ते बाहेरून आणलेले आहेत. प्राचीन काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर दगडांची वाहतूक करून हे बांधकाम करणे, हे त्या काळातील अभियांत्रिकी कौशल्याचे दर्शन घडवते.

या उत्खननात केवळ जलसाठाच नाही, तर प्राचीन काळातील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्वाचे पुरावेही हाती लागले आहेत. यामध्ये रोमन संस्कृतीशी संबंधित ‘इंडो-मेडिटरेनियन अम्फोरा’चे तुकडे, मेसोपोटेमियन ‘टॉर्पेडो जार’ आणि काचेच्या विविध वस्तू सापडल्या आहेत. याशिवाय 3000 हून अधिक मातीच्या भांड्यांचे तुकडे आणि कलचुरी घराण्याच्या काळातील 11 नाणीही सापडली आहेत.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *