औदुंबर येथील श्री दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी

सांगली, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कृष्णा आणि कोयना नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ गतीने होत आहे. काल सायंकाळ पासून सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथिल श्री दत्त मंदीरात कृष्णा नदीचे पाणी शिरले. तर आज मंदिराच्या गाभा-यात पाणी गेले आहे. यामुळे पुजार्यांकडून गुरू नामाच्या गजरात मंदिराला प्रदक्षिणा घालून देव वरच्या देवघरात नेण्यात आले.
त्यानंतर वरच्या मंदिरात श्री दत्त देवाची पूजाअर्चा देवघरात सुरू झाली आहे. सर्व भाविकांनी वरच्या मंदिरात श्री दत्त महाराजांचे दर्शन घ्यावे असे आवाहन औदुंबर दत्त मंदिराचे विश्वस्थ धनाजी सूर्यवंशी यांनी केले आहे. Water in the core of Sri Dutt temple at Audumbar
ML/ML/PGB
24 July 2024