दादर परळ प्रभादेवी परिसरात गुरुवार, शुक्रवारी पाणीकपात

 दादर परळ प्रभादेवी परिसरात गुरुवार, शुक्रवारी पाणीकपात

मुंबई दि.26(एम एमसी न्यूज नेटवर्क): लोअर परळ परिसरातील १,४५० मिलीमीटर व्यासाची तानसा मुख्य जलवाहिनी दुरूस्तीचे काम गुरुवार रात्री १० वाजेपासून शुक्रवार रात्री ८ वाजेदरम्यान हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या २२ तासांच्या कालावधीत दादर परळ प्रभादेवी येथील काही परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णत: तर काही ठिकाणी अंशत: बंद राहणार आहे.
लोअर परळ येथील सेनापती बापट मार्गावरील गावडे चौकात अस्तित्वात असलेल्या १ हजार ४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम जल अभियंता विभागाकडून हाती घेण्यात येणार आहे . गुरूवार, २८ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता हे काम हाती घेण्यात येईल. शुक्रवार २९ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता ते पूर्ण होईल. या अंतर्गत संपूर्ण जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करावा लागणार आहे. दुरुस्ती कामाच्या प्रत्यक्ष कालावधीत जी दक्षिण व जी उत्तर विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.

या काळात करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ, लोअर परळ परिसर , संपूर्ण प्रभादेवी परिसर, पी. बाळू मार्ग, हातिसकर मार्ग, आदर्श नगर, जनता वसाहत, अप्पासाहेब मराठे मार्ग, वीर सावरकर मार्ग, ना. म. जोशी मार्ग, सेनापती बापट मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, गणपतराव कदम मार्ग, प्रभादेवी आणि संपूर्ण लोअर परळ स्थानक परिसर , सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील. तर सेनापती बापट मार्ग, एल. जे. मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, अरूणकुमार वैद्य मार्ग येथील पाणीपुरवठा अंशत: बंद राहील.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *