जलसंधारणाचे प्रकल्प तुडूंब, पाण्याची चिंता मिटली
वाशिम, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम जिल्ह्यात मृद तथा जलसंधारण विभागाच्या अखत्यारित ९२ जलप्रकल्प आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या ताब्यातील ७७ प्रकल्पांची यशस्वी कार्यवाही सुरू आहे. एकूण १६९ जलप्रकल्पांपैकी १४३ प्रकल्पांमध्ये पाणीसाठा १०० टक्के भरला आहे, आणि पैनगंगा नदीवरील बॅरेजेसही तुडूंब भरलेली आहेत. सोनल आणि अडाण मध्यम प्रकल्पांनी देखील १०० टक्के पाणीसाठा ओलांडल्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता पूर्णपणे मिटली आहे. तसेच शेतकऱ्यांना रब्बीत जलसाठा उपलब्ध होणार असून त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
SL/ML/SL
24 Oct. 2024