पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यानं वारणा धरणातून विसर्ग….

सांगली दि २६ :- वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्यानं वारणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. जलाशय परिचरण सूची प्रमाण धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या वक्र द्वाराद्वारे 8630 क्युसेक्स आणि विद्युत गृहातून 1630 क्युसेक असं एकूण 10,260 क्युसेक्स विसर्ग वारणा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळ नदी पातळी वाढ होणार असल्यानं नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. असं वारणा धरण व्यवस्थापनाकडून कळविण्यात आलं आहे.