फिटनेस आणि सौंदर्य टिकवायचं आहे? झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी करायला विसरु नका

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्त्री असो की पुरुष प्रत्येक जण चांगले आरोग्य आणि सुंदर त्वचेचे स्वप्न पाहत असतात. ज्यासाठी प्रत्येक जण अनेक प्रयत्न करतात. असे असूनही अनेक वेळा त्यांची समस्या जैसे थेच राहते. अशा परिस्थितीत घरातील कामे आणि ऑफिसच्या तणावामुळे जर तुम्ही स्वत:ची काळजी घेण्यासाठी वेळ काढू शकत नसाल तर झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी रोज फक्त ५-१० मिनिटे करा. योगा आणि लाइफस्टाइल तज्ञ काम्याने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडिओमध्ये महिलांना अशा ५ गोष्टी सांगितल्या आहेत ज्या दररोज रात्री झोपण्यापूर्वी केल्यास त्वचा सुंदर आणि निरोगी बनवू शकतात.
फेस वॉश
रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने नैसर्गिक क्लिंजरने चेहरा स्वच्छ करा. याने फ्रेश वाटेल.
कोमट पाण्यात पाय भिजवा
महिलांनी रात्री झोपण्यापूर्वी १० मिनिटे कोमट पाण्यात पाय भिजवावेत. गरम पाणी ब्लड सर्कुलेशन सुधारते. यामुळे पायातील नसांची संकुचितता कमी होते. त्यामुळे पायांची सूज झपाट्याने कमी होऊ लागते. असे केल्याने त्वचा हायड्रेटेड होते आणि तणाव कमी होतो. रक्त परिसंचरण सुधारते, झोपेची गुणवत्ता सुधारते आणि विश्रांती मिळते.
चेहऱ्याची मसाज
रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला ५ ते १० मिनिटे मसाज करा. असे केल्याने डोळ्यांखालील डार्क सर्कल कमी होतात आणि डोळ्यांवरील सूज आणि सुरकुत्या कमी होतात. याशिवाय डोळ्यांच्या आजूबाजूची निवळणारी त्वचा घट्ट होते. चेहऱ्याच्या मसाजसाठी तुम्ही कोणतेही चांगले फेशियल ऑइल वापरू शकता. असे केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात आणि चेहऱ्यावर चमकही येते.
पायाची मालिश
रात्री झोपण्यापूर्वी पायाची मालिश करण्याचे अनेक फायदे आहेत. असे केल्याने रक्ताभिसरण तर सुधारतेच पण मेनोपॉजच्या लक्षणांपासूनही आराम मिळतो. तुमच्या पायाची मालिश करण्याच्या फायद्यांमध्ये शरीर रिलॅक्स होण्यासोबतच चांगली झोप, शरीराच्या वेदनापासून आराम, नैराश्यापासून आराम आणि मूड स्विंग यांचा समावेश होतो.
नाभीत तेल लावा
रात्री झोपण्यापूर्वी नाभीत तेल लावल्याने त्वचेची आर्द्रता तर राहतेच पण पोटदुखी, मासिक पाळीच्या वेदना यापासून आराम मिळण्यासोबतच नाभीमध्ये साचलेली घाण साफ होण्यास मदत होते आणि प्रजनन क्षमता आणि दृष्टी सुधारते. Want to maintain fitness and beauty? Don’t forget to do these 5 things before going to bed
ML/KA/PGB
28 Jan 2024