सेनादलात प्रवेश हवा, मग हे पहा

 सेनादलात प्रवेश हवा, मग हे पहा

मुंबई, दि २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सेनादलात प्रवेश हवा आहे मग इथे लक्ष द्या. श्री शिवाजी मंदिर आणि कॅप्टन वंजारी अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच छत्रपती हायर एज्युकेशन इंटलेक्चुअल फोरम यांच्या सहकार्याने छत्रपती शाहू सभागृह, तिसरा मजला, शिवाजी मंदिर,दादर येथे शनिवार दिनांक 25/11/2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता यासंदर्भात एक व्याख्यान / मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये शिवाजी मंदिरचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, वंजारी अकॅडमीचे संचालक कॅप्टन सुरेश वंजारी,हे विद्यार्थी,पालक तसेच सैन्यदलात प्रवेश घेण्याकरिता उत्सुक असलेल्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

हे मार्गदर्शन / व्याख्यान विनामूल्य आयोजिण्यात आले आहे. हया संरक्षण विषयाच्या मार्गदर्शनाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी संपर्क राजेश नरे आणि जितेश सावंत यांच्याशी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ML/KA/SL

23 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *