महामार्गावर वाघाच्या शिकारीचा थरार …
चंद्रपूर दि ६ – मूल महामार्गावर “मामा मेल” वाघाच्या शिकारीचा थरार पहायला मिळाला. भर दिवसा त्याने महामार्गावरून गाईची शिकार ओढत नेली, रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांनी मोबाईल कॅमेरात हे दृश्य कैद केले. मामा मेलच्या शिकारीचे हे दृश्य, मुल चंद्रपूर महामार्गावरील मामला परिसरातील आहे, इथेच मामा मेल या अतिशय प्रसिद्ध वाघाचा अधिवास आहे. आगडी भागात काल महामार्गाच्या बाजूला त्याने गाईची शिकार करून शिकारीवर ताव मारला, त्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांनी त्या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे मामा मेलने आपली शिकार महामार्ग ओलांडून जंगलाच्या आत ओढून नेली. मामा मेल च्या या थरारक शिकारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.ML/ML/MS