पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या अधिवासात सोडली गिधाडे

 पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या अधिवासात सोडली गिधाडे

नागपूर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर अंतर्गत अमलतास पर्यटन संकुल, सिल्लारी येथे “गिधाड मुक्ती कार्यक्रम” आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रवीण चव्हाण, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव पूर्व. डॉ. प्रभुनाथ शुक्ला, क्षेत्र संचालक आणि उपसंचालक पेंच व्याघ्र प्रकल्प हे देखील उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौरभ रुहेला, वरिष्ठ संशोधन अधिकारी, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांनी पूर्व पेंच पिपरिया वनपरिक्षेत्रातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गिधाड संवर्धनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य कुंदन हाते यांनी गिधाडांचे संवर्धन आणि त्यांचा अधिवास नष्ट होण्यापासून वाचवणे या विषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेनंतर नागपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरद्वारे सुटका करण्यात आलेल्या दोन लांबलचक गिधाडांना पूर्व पेंच पिपरिया वनपरिक्षेत्रातील अंबाखोरी येथील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

गिधाडांवर दीर्घकाल नजर ठेवण्यासाठी रिंग लावण्यात आली आहे. या गिधाडांना टीटीसीमधून आणण्यासाठी खास तयार केलेल्या पिंजऱ्यांचा वापर करण्यात आला. यशवंत नागुलवार, सहाय्यक वनसंरक्षक, विजय गंगावणे, सहाय्यक वनसंरक्षक, विवेक राजूरकर वनपरिक्षेत्र अधिकारी पूर्व पेंच, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी टेंभुर्णे, डॉ. सुदर्शन काकडे, डॉ. राजेश फुलसंगे आणि पूर्व पेंच पिपरिया वन परिक्षेत्रातील सर्व अधिकारी , कर्मचारी यांच्यासह सृष्टी पर्यटन मंडळ, नागपूरचे विनीत अरोरा उपस्थित होते. Vultures released in Pench Tiger Reserve habitat

ML/KA/PGB
5 Sep 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *