यवतमाळ- वाशीम मध्ये अवकाळी पावसाची हजेरी

यवतमाळ वाशीम दि. १५–
यवतमाळ शहर उन्हाच्या कडाक्यात तापत असताना, आज अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून लोकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. वाशीम जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम असून बेलोरा विठोली परिसरात मुसळधार सरी कोसळल्या.
वाशीम जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून, मानोरा तालुक्यातील बेलोरा विठोली परिसरात आज जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असून, खरीप हंगामाच्या तयारीला गती मिळणार आहे.
खरीप हंगाम जवळ येत असतानाच या पावसामुळे जमिनीत ओलावा तयार होण्यास मदत झाली असून, नांगरणी, कुळवाच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. ML.MS