एकनाथ शिंदे यांनी घेतली उपराष्टपतींची भेट…

नवी दिल्ली दि १२– देशाचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांना उपराष्ट्रपती पदाच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सी. पी. राधाकृष्णन यांनी ज्या प्रामाणिकपणे आणि निष्पक्षतेने महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आपली कारकिर्द यशस्वीपणे व्यतीत केली, त्याप्रमाणे ते उपराष्ट्रपती पदाची जबाबदारीही सक्षमरित्या पार पडतील आणि संसदेच्या वरिष्ठ सभागृहाची प्रतिमा उन्नत राखतील या शुभेच्छा शिंदे यांनी त्यांना दिल्या. यावेळी माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ आणि राधाकृष्णन कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते.ML/ML/MS