8 राज्यांतील 57 लोकसभा जागांवर उद्या मतदान

 8 राज्यांतील 57 लोकसभा जागांवर उद्या मतदान

नवी दिल्ली, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणूक-2024च्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात उद्या (1 जून) 7 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 57 जागांवर मतदान होणार आहे. या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, दोन केंद्रीय मंत्री आरके सिंह आणि अनुराग ठाकूर रिंगणात आहेत. तर ४ कलाकार- कंगना रणौत, रवी किशन, पवन सिंह, काजल निषाद हेदेखील निवडणूक लढवत आहेत.याशिवाय ममतांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी, अफजल अन्सारी, विक्रमादित्य सिंग हेही नशीब आजमावत आहेत.

उद्या होणाऱ्या निवडणूकीत वाराणसी ही सर्वात व्हीआयपी सीट आहे. पंतप्रधान मोदी गेली 10 वर्षे येथील खासदार आहेत. आता त्यांच्या सलग तिसऱ्या विजयाकडे त्यांच्या फॉलोवर्स वाट पाहत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींच्या विरोधात फक्त 6 उमेदवार इथून निवडणूक लढत आहेत. सुरुवातीला 141 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अजय राय हे काँग्रेस-सपा आणि भारतीय आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत, मात्र गेल्या तीन निवडणुकांमध्ये त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सातव्या टप्प्यात 904 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यापैकी 809 पुरुष आणि 95 महिला उमेदवार आहेत.या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार हरसिमरत कौर बादल या पंजाबमधील भटिंडा येथील उमेदवार आहेत. त्यांच्याकडे 198 कोटी रुपयांची संपत्ती आहे. लोकसभेच्या 542 जागांपैकी सहाव्या टप्प्यापर्यंत 485 जागांवर मतदान झाले आहे. शेवटच्या 57 जागांसाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. गुजरातमधील सुरतमधून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांनी बिनविरोध निवडणूक जिंकली आहे, त्यामुळे केवळ 542 जागांवर मतदान होत आहे.

SL/ML/SL

31 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *