२१ राज्यांतील लोकसभेच्या १०२ जागांसाठी उद्या मतदान

 २१ राज्यांतील लोकसभेच्या १०२ जागांसाठी उद्या मतदान

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात एकीकडे लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग आणि प्रचारसभांची रणधुमाळी सुरू असताना उद्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. देशातील लोकसभेच्या ५४३ जागांसाठी सात टप्प्यात निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या (19 एप्रिल) होणार आहे. २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ जागांसाठी हे मतदान होणार आहे. उद्या पहिला टप्पा महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. उद्या होणाऱ्या निवडणूकीत तमिळनाडू राज्यातील सर्वांधिक ३९ लोकसभा जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकूण १६२५ उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी १४९१ पुरुष आणि १३४ महिला उमेदवार आहेत. यापैकी केवळ ८% महिला आहेत.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (ADR) ने १६१८ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांमध्ये दिलेल्या माहितीचा अहवाल तयार केला. त्यापैकी १६% म्हणजेच २५२ उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. ADR ने आपल्या अहवालात म्हटले आहे की निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील १६१८ उमेदवारांपैकी ४५० म्हणजेच २८ टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. त्यांच्याकडे एक कोटी किंवा त्याहून अधिक किमतीची संपत्ती आहे. १० उमेदवारांनी त्यांची संपत्ती शून्य घोषित केली आहे, तर तीन उमेदवारांची संपत्ती ३०० ते ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. तामिळनाडूच्या थुथुकुडी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार के. पोनराज 320 रुपयांसह सर्वात गरीब उमेदवार आहेत.

उद्या पहिल्या टप्प्यात निवडणूका होणारी राज्य

तमिळनाडू राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र , आसाम, उत्तराखंड,बिहार, प. बंगाल, मेघालय, अरुणाचल प्रदेश,मणिपूर, पुद्दुचेरी, मिझोरम,छत्तीसगड, जम्मू-काश्मीर,लक्षद्विप, सिक्कीम, त्रिपुरा, नागालँडल, अंदमान निकोबार

महाराष्ट्रातील मतदानाचे वेळापत्रक

पहिला टप्पा – १९ एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा – २६ एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा – ७ मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा – १३ मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा – २० मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

१९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यात लोकसभा निवडणूका होणार असून तर ४ जूनला निकाल लागणार आहे. मतदानापासून निकालापर्यंत 46 दिवस लागणार आहेत. लोकसभेसोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *