पहिल्या ट्प्यासाठी मतदान यंत्रणा सज्ज, मान्यवर उमेदवार रिंगणात

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अठराव्या लोकसभेसाठी होत असलेल्या निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातल्या १०२ मतदारसंघांसाठीचे मतदान उद्या होत आहे. लोकशाहीच्या ह्या उत्सवात सहभागी होऊन सर्व मतदारांना आपला हक्क बजावता याव्यात, यासाठी निवडणूक आयोगासह, सगळ्या यंत्रणा सज्ज आहेत. यात, बस्तरसारखा नक्षलग्रस्त संवेदनशील भाग आहे, तर लक्षद्विप, अंदमान निकोबार सारख्या बेटांवरचे मतदार संघही आहेत. तर, नागालँड, त्रिपुरा सारख्या ईशान्य भारतातल्या पूर्व टोकाच्या राज्यांचाही समावेश आहे.
राजस्थान, तामिळनाडू आणि विदर्भासारख्या उष्ण हवामानाच्या प्रदेशांचा समावेश आहे, त्याचवेळी, जम्मू काश्मीरसारख्या थंड प्रदेशातही मतदान होणार आहे. अशा सर्व ठिकाणी निवडणूक विभागाचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक, मतदान निर्भर आणि मुक्त वातावरणात व्हावं यासाठी परिश्रम घेत आहेत. अनेक विद्यमान आणि माजी मंत्र्यांसह, 102 जागांवरच्या 1600 पेक्षा अधिक उमेदवारांचा फैसला उद्या मतदानयंत्रात बंद होणार आहे. यात पूर्व विदर्भातल्या पाच महत्वाच्या मतदारसंघांचाही समावेश आहे.
उपराजधानी नागपूरमधून नितीन गडकरी यांची महत्वाची जागा, गडचिरोली- गोंदिया सारखे संवेदनशील भाग, अशा सर्व भागातले नागरिक उद्या, आपल्या खासदारांची निवड करणार आहेत. याशिवाय तामिळनाडूतील कानिमोळी, अण्णामलाई, तमिळसाई सौदरराजन , मध्यप्रदेशातून नकुलनाथ, आसाम मधून तरुण गोगोई , बिहारमधून जीतनराम मांझी आदी नेत्यांचा समावेश आहे.
ML/ML/SL
18 April 2024