यावेळी पहिल्यांदा लोकसभेसाठी करता येईल घरी बसून मतदान

 यावेळी पहिल्यांदा लोकसभेसाठी करता येईल घरी बसून मतदान

पुणे, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) 2024 हे वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी यावेळी पहिल्यांदा घरी बसून मतदान करता येणार आहे. ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले तसेच 40 टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असलेले मतदार घरी मतपत्रिका मागवून घेऊ शकतील असे आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले. घरी बसून मतदानचा पहिला प्रयोग कसबा पोट निवडणूकीत करण्यात आला होता..

निवडणुकीत पारदर्शकता यावी यासाठी ५० टक्के पोलिंग स्टेशन वेब कास्टिंगसोबत जोडली जाणार आहेत, मतदारांना मतदान केंद्रावर उमेदवारविषयीची माहिती मिळणार आहे. उमेदवारावर दाखल असलेले गुन्हे तसेच इतर आवश्यक माहिती फलकावर दिली जाईल असेही त्यांनी सांगितले.

पुढील दोन आठवड्यात निवडणूक आयोग महाराष्ट्रातील आढाव्यासाठी येणार आहे. शिक्षकांना निवडणुकीच्या कामात सहभागी करून घेण्याविषयीची तरतूद आहे. १२ विभाग आहेत, ज्यांना निवडणूक कामात घेतलं जातं असे देशपांडे म्हणाले..

लोकशाहीमध्ये मतदारांचा सहभाग महत्वाचा असल्याने निवडणूक आयोगाने सर्वसमावेशक निवडणूक प्रक्रियेवर भर दिला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्रीकांत देशपांडे यांनी यावेळी केले. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद मध्ये ते बोलत होते…

देशपांडे पुढे म्हणाले, निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी दिव्यांग, महिला, युवक, तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक, कामगार, कलावंत, साहित्यिक, नाटककार आदी सर्वांनाच मतदार नोंदणी करण्यासोबतच मतदान करण्याविषयी प्रात्सोहित करावे. महाविद्यालयासोबत बैठक घेऊन सर्व नवमतदारांच्या नोंदणीसाठी आवाहन करावे. महाविद्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या पालक सभेत मतदानाविषयी जनजागृती करावी. ..

सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान होईल, मतदानाच्यावेळी मतदान केंद्रांची माहिती होण्यासाठी मतदान माहिती पत्रिकेचे वितरण होईल, याची दक्षता घ्यावी. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार संघामध्ये दिव्यांग, महिला, एकमेवाद्वित्तीय अशी आदर्श मतदान केंद्रे स्थापन करण्याबाबत कार्यवाही करावी.

अतिसंवेदनशील आणि संवेदनशील मतदान केंद्राला पोलीस विभागासोबत भेटीचे आयोजन करुन आवश्यक त्या सर्व सुरक्षेच्या आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थांना मतदार नोंदणीप्रसंगी प्रशासनाच्या
वतीने आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवाव्यात. महिला मतदारांची नोंदणी करुन मतदान जनजागृतीपर मेळावे आयोजित करण्यासोबतच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत करावेत. मतदार यादीच्या माहितीचे (डाटा) दर आठवड्याला अवलोकन करावे. मतदार नोंदणीच्या अनुषंगाने प्राप्त सर्व अर्ज विहीत मुदतीत निकाली काढावे तसेच प्राप्त तक्रारीची गांभीर्याने दखल घेत निराकरण करावे. मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यासाठी यासाठी त्यातील त्रुटीची पूर्तता करावी. या बाबी करताना राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन कार्यवाही करा, असे निर्देश यावेळी श्रीकांत देशपांडे यांनी दिले.

ML/KA/SL

24 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *