विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार

 विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे. यासाठी भाजपाच्या पाच जणांच्या नावांची यादी सोमवार १ जुलैला जाहीर करण्यात आली. पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. यानिमित्ताने लोकसभेतील पराभवानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली असली तरी त्यांना मंत्रिपद मिळणार का? यावर चर्चा सुरु झाली आहे. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता पंकजा मुंडे सारखा ओबीसी चेहरा राज्यात भाजपसाठी लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे आता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दरम्यान, महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 11 जागा 27 जुलै रोजी रिक्त होत आहेत. या जागा विधानसभा सदस्यांमधून भरल्या जाणार असून सध्याचं संख्याबळ पाहता भाजपच्या 5, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनचे 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी होऊ शकतात. Voting for 11 Legislative Council seats will be held on July 12

ML/ML/PGB
1 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *