भायखळ्यात झाली “वोट चोर… गद्दी छोडसाठी भव्य स्वाक्षरी मोहिम
मुंबई प्रतिनिधी, दि. २५ : लोकसभेचे विरोधी पक्ष नेते काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीदरम्यान मतदार यादीतील मतचोरी विरोधात संघर्ष सुरु केला असून, “संविधानाचे आणि भारतीय लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी” आज भायखळा विभाग येथे माजी आमदार मधु चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ब्लॉक काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, महिला कॉंग्रेस तसेच सर्व सेलतर्फे केंद्रातील भ्रष्टाचारी भाजपा सरकारने केलेल्या वोट चोरी विरोधात “वोट चोर, गद्दी छोडसाठी भव्य स्वाक्षरी मोहिम डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ, माझगांव येथे घेण्यात आली. त्यास नागरिकांचा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वोट चोर केल्याबाबत गंभीर केली असून हे भारतीय संविधानांना फार धोकेदायक आहे.
संविधानामध्ये संविधानाच्या माध्यमातून निवडणुका झाल्या पाहिजे आणि मतांची चोरी न होता लोकशाही पद्धतीने मतदान झाले पाहिजे. परंतु तसे न होता केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वोट चोरी करून सत्तेवर येत आहेत. अनेक ठिकाणी निवडणुकीत नाव नसून त्या ठिकाणी मतदान केले जाते ही कोणती लोकशाही असा प्रश्न आम्ही विचारत आहे. हे स्वाक्षरी अभियान आता एक सुरुवात असून यापुढे जनआंदोलन उभे राहणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते, माजी आमदार मधु अण्णा चव्हाण यांनी यावेळी दिली. यावेळी कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक जनतेने या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.