निवासी व व्यावसायिक भागात ध्वनिप्रदूषणात सातत्याने वाढ

 निवासी व व्यावसायिक भागात ध्वनिप्रदूषणात सातत्याने वाढ

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महापालिकेकडून सादर करण्यात आलेल्या पर्यावरण स्थितीदर्शक अहवालात शहरात निवासी व व्यावसायिक भागात ध्वनिप्रदूषणात सातत्याने वाढ होत असल्याचे नमुद करण्यात आले आहे.

परंतु गेल्या काही वर्षात मुंबई नाका भागात वाहतूक वाढल्याने या भागाचा सर्वाधिक ध्वनिप्रदूषण पातळीच्या यादीत नव्याने समावेश झाला. महापालिकेकडून २०२१-२२ व २०२२-२३ या दोन वर्षांचा एकत्रित पर्यावरण स्थितीदर्शक अहवाल सादर करण्यात आला. या अहवालातून ध्वनी, वायु व पाणी प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत प्रदूषणाचे प्रमाण कमी असले तरी वाढती वाहने व विकासामुळे प्रदूषणासारख्या गंभीर समस्यादेखील समोर आल्याचे नमुद करण्यात आल्याने विकास हवा की नको, असा सवाल निर्माण झाला आहे. निवासी क्षेत्रापैकी पंचवटी कारंजा, द्वारका तर व्यापारी क्षेत्रातील अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीच्या तुलनेत मेन रोड, त्र्यंबक रोड, मुंबई नाका, जुने सीबीएस, इंदिरानगर, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल या भागात अधिक ध्वनिप्रदूषण आढळले.

ध्वनिप्रदूषणामुळे मानसिक व शारीरीक संतुलन बिघडण्याचा धोका आहे. ध्वनिप्रदूषणामुळे प्राणी, पक्षी अधिवासाला धोका पोचत असल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे.उत्सवकाळात अधिक प्रदूषणश्री गणेशोत्सव काळात रामतीर्थ, नाशिक रोड, गाडगे महाराज पुतळा, त्रिमूर्ती चौक व सातपूर, सिडको भागात ८० डेसिबल्स पेक्षाही अधिक ध्वनी पातळी आढळली. सीबीएस, पंचवटी, दहीपूल, सिडको, बिटको या भागात दिवाळीत ७४ डेसिबल्सपर्यंत ध्वनी मर्यादा पोचल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे. औद्योगिक क्षेत्रात सातपूरमध्ये दिवसा ७३.१ तर रात्री ६२.६ डेसिबल्स, तर अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये दिवसा ७१.६ तर रात्री ६३.२ डेसिबल्स ध्वनी मर्यादा आढळली. शांतता क्षेत्रात अशोक मेडिकव्हर रुग्णालय परिसरात दिवसा ४५.२ डेसिबल्स तर रात्री ३४ डेसिबल्स ध्वनी मर्यादा आढळली आहे.

PGB/ML/PGB
26 Aug 2024

Piyusha Bandekar

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *