विवेकानंद जन्मोत्सव महाप्रसाद 50 एकरावर बसलेल्या महापंगतीला
बुलडाणा, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे विवेकानंद जयंती उत्सवाची सांगता 14 जानेवारीला महाप्रसादाने झाली . 250 क्विंटल पुरी आणि 250 क्विंटल वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद एकाच वेळी 50 एकर शेतात बसलेल्या नागरिकांना 150 ट्रॅक्टरच्या सहाय्याने 2 हजार स्वंयसेवकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने वाढून करून महापंगतीला भोजन वितरित केले.
स्वामी विवेकानंद यांच्या रथाने 50 एकरात बसलेल्या महापंक्तीच्या मधोमध भ्रमण केलं यावेळी नागरिकांनी या रथावर पुष्प उधळून स्वामीजींना अभिवादन केले त्यानंतर खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
श्लोक म्हणून नंतर महापंगतीतील नागरिकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला . या महापंगतीत महिला आणि पुरुषांना बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती स्वामी विवेकानंद जयंती उत्सवाची सांगता महाप्रसादाने करण्याची वर्षानुवर्षाची ही परंपरा हिवरा आश्रम येथे आजही जपल्या जात आहे या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला राज्यभरातून नागरिक येत असतात.
ML/KA/PGB
15 Jan 2022