विवेक अग्निहोत्रींनी केली महाभारतावर आधारित चित्रपटाची घोषणा

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
‘द कश्मीर फाइल्स’,’द वॅक्सिन वॉर’ अशा लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांच्या निर्मितीनंतर बॉलिवूड निर्माते विवेक अग्निहोत्रींनी आता एका महत्त्वाच्या चित्रपटाची घोषणा केली आहे. विवेक अग्निहोत्री यांचा ‘पर्व’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एसएल भैरप्पा यांच्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट असणार आहे. कन्नड भाषेतील हे पुस्तक महाभारताची कथा एका नव्या पद्धतीने सांगते. या चित्रपटात तुम्हाला महाभारतातील पात्रांची कथा पाहायला मिळणार आहे.
गेल्या काही महिन्यांत अग्निहोत्री यांनी लागोपाठ लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली असल्याने महाभारतावरील ‘पर्व’ या त्यांच्या आगामी चित्रपटाकडून समीक्षक आणि चाहत्यांच्या अपेक्षा खूप वाढल्या.त्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या आहेत. या चित्रपटाबाबत जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.
SL/KA/SL
22 Oct. 2023